बिबट्याने केली नील गायीची शिकार ; गेवराई सेमी परिसरात घबराट

Foto
 सिल्लोड, (प्रतिनिधी)  : तालुक्यातील गेवराई सेमी शिवारात बिबट्याने निलगाईची शिकार केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
 
यामुळे परिसरातील शेतकऱ्यांसह शेतमजुरांमध्ये भीती पसरली आहे. सुभाष गोरखनाथ ताठे यांच्या गेवराई सेमी शिवारातील गट नंबर शेताशेजारील डोंगरावर ५६९ लिंबाच्या झाडावर अर्धवट फस्त पेरणीच्या शेतकऱ्यांसह माहिती येथील केलेली मृतावस्थेतील निलगाय आढळून आली. याविषयीची शेतकऱ्यांनी वनविभागाला कळविली.

वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता त्यांना बिबट्याच्या पायाचे ठसे दिसून आले. सध्या रब्बी पेरणीची लगबग सुरू आहे. दिवसा वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पिकांना पाणी भरण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीचे शेतात जावे लागत आहे. त्यातच बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्यात भीती निर्माण झाली आहे. वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी गेवराई सेमीसह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.